कुरुंदवाड : राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विजयानंतर उधळला गुलाल | पुढारी

कुरुंदवाड : राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विजयानंतर उधळला गुलाल

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून आल्यानंतर शहरात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.

येथील पालिका चौक थिएटर चौक, सन्मित्र चौक, माळभाग, ईगल चौक, भैरवाडी येथे राज्यमंत्री डॉ. पाटील यड्रावकर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलाल उधळून शहरातून विजयी रॅली काढली.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रवेश केला आहे. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील संस्था सोसायट्यांना आर्थिक पुरवठा करत त्यांची आर्थिक पत वाढविण्याचे कार्य केले आहे. ठराव धारकांनी ही निवडणूक स्वतः हातात घेऊन राज्यमंत्री डॉक्टर पाटील-यड्रावकर यांना दुसऱ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाठविल्याचे सांगितले.

यावेळी नगरसेवक उदय डांगे, अक्षय आलासे, दीपक पोमाजे, अभय पाटूकले, रघु नाईक, बबलू पवार यांनी भाषणे केली.
यावेळी अर्शद बागवान उमेश कर्नाळे, बबलू बागवान, अखिल गोलंदाज, भीमराव यादव, शुभम जोग, दादासाहेब कुरणे, आण्णासाहेब वाले, अजय बलवान, आप्पासाहेब मोहिते, जिंनगोंड पाटील, रावसाहेब बडबडे, गणपती कागे आदी उपस्थित होते.

Back to top button