KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व | पुढारी

KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले आहे. याआधी ६ जागा बिनविरोध आणि आता मतदानानंतर त्यांच्या ६ जागा निवडून आल्या आहेत.

जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात १०० टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात ४४८ पैकी ४४६, पतसंस्था गटात १२२१ पैकी १२०७, इतर संस्था गटात ४११५ पैकी ३९९५ असे सरासरी ९८ टक्के चुरशीने मतदान झाले होते.

शाहुवाडीत सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. सर्जेराव पाटील – पेरीडकर पराभूत झाले आहेत. तर रणवीर गायकवाड निवडून आले आहेत. रणवीर गायकवाड यांना ९९ तर सर्जेराव पाटील – पेरीडकर यांना ६६ मते मिळाली आहेत.

आजाऱ्यातील विद्यमान संचालक अशोक चराटी पराभूत झाले आहेत. सत्ताधारी गटाचे सुधीर देसाई विजयी झाले आहेत. सुधीर देसाई यांना ५७ तर अशोक चराटी यांना ४८ मते मिळाली आहेत.

शिरोळमधून मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते, तर यड्रावकर यांनी ९८ मते मिळाली आहे.

KDCC Bank Election : मतपेटीत सापडल्या मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या अन् पैसे…

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला आज शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मतपेट्या उघडताच त्यात मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. ‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा…आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.

हे ही वाचा :

Back to top button