कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : आज मतदान | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : आज मतदान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) बुधवारी मतदान होत आहे. 15 जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या 33 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

जिल्ह्यात 13 ठिकाणी 40 केंद्रांवर मतदान घेण्यात ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 अशी मतदानाची वेळ आहे. मतमोजणी शुक्रवारी होणार आहे.

जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) निमित्ताने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सर्वच नेते तयार होते; परंतु त्यासाठी थांबायला मात्र कोणी तयार नसल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विचित्र आघाड्या तयार झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती, भाजप हे मातब्बर एका बाजूला आणि शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष व रिपब्लिकन पक्ष दुसर्‍या बाजूला, अशी परिस्थिती निर्माण झाली. यातून दोन आघाड्या तयार झाल्या आणि एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.

मतदानाचा दिवस जवळ येईल तशी निवडणुकीतील रंगत वाढू लागली. राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात जोरदार टीका सुरू केल्यानंतर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यात आले. जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याने या निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी आ. अमल महाडिक व ए. वाय. पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 15 जागांसाठी 33 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत 7 हजार 651 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतमोजणी शुक्रवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्रे ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

  • करवीर : वि. स. खांडेकर प्रशाला, प्रतिभानगर
  • आजरा : डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल
  • चंदगड : महात्मा फुले विद्यालय,
  • कार्वे गगनबावडा : श्री. माधव विद्यामंदिर, गगनबावडा
  • कागल : श्री शाहू हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, कागल
  • राधानगरी : राजर्षी शाहू विद्यामंदिर, राधानगरी
  • भुदरगड : केंद्रीय विद्यामंदिर गारगोटी
  • गडहिंग्लज : डॉ. झाकीर हुसेन विद्यालय, गडहिंग्लज
  • हातकणंगले : श्री. रामराव इंगवले हायस्कूल, हातकणंगले
  • पन्हाळा : फोर्ट इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी, वाघबीळ, पन्हाळा
  • शाहूवाडी : श्री शाहू हायस्कूल, शाहूवाडी
  • शिरोळ : श्री पद्माराजे विद्यायल, ज्युनिअर कॉलेज, शिरोळ

प्रमुख मुद्दे 

  • सहा जागा बिनविरोध
  • 13 ठिकाणी 40 मतदान केंद्रे
  • मतदारांची संख्या ः 7 हजार 651

Back to top button