केडीसीसी बॅंक निवडणूक: विरोधकांनो कारभारावर बोला; पालकमंत्र्यांचे आव्हान | पुढारी

केडीसीसी बॅंक निवडणूक: विरोधकांनो कारभारावर बोला; पालकमंत्र्यांचे आव्हान

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

केडीसीसी बॅंक निवडणूक : विरोधकांनी व्यक्तिगत टिपण्णी करण्यापेक्षा गेल्या पाच वर्षांतील जिल्हा बँकेच्या कारभारावर बोलावे, असे आव्हान पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री आणि बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘जिल्हा बँकेचा कारभार राजकारण विरहित झाला पाहिजे हीच आपली भूमिका आहे. विरोधक करत असलेल्या व्यक्तीगत टिकाटिपण्णीमुळे शेतकरी सभासदामध्ये शंका निर्माण होईल. त्यामुळे विरोधकांनी व्यक्तिगत टीकाटिपणी करण्याऐवजी गेल्या पाच वर्षातील बँकेच्या कारभारावर बोलावे.

केडीसीसी बॅंक निवडणूक : राजकीय मतभेद बाजुला ठेवा

ज्यावेळी आम्ही बँकेची पायरी चढतो त्यावेळी राजकारण बाजूला ठेवून केवळ सभासदांच्या हिताचाच विचार आपल्या मनामध्ये असतो. राजकीय पादत्राणे बाहेर ठेवूनच बँकेचा कारभार झाला पाहिजे. राजकारण विरहित संस्थेचा कारभार व्हावा या हेतूनेच, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र आता ही निवडणूक लागली असली तरी गेल्या पाच वर्षातील बँकेच्या कारभारावर विरोधकांनी बोलावे.’

यावेळी आ. पी. एन. पाटील, आ. प्रकाश आवाडे, माजी खा. श्रीमती निवेदिता माने, चेअरमन विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, माजी नगरसेवक राजेश लाटकर आदींनी मनोगते व्यक्त केली.

मेळाव्याला आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बजरंग पाटील, संचालक भैय्या माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांच्यासह इतर मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button