कोल्हापूर : वाठारच्या शरण्या निधी बँकेकडून २१ लाखांची फसवणूक

कोल्हापूर : वाठारच्या शरण्या निधी बँकेकडून २१ लाखांची फसवणूक
Published on
Updated on

किणी; पुढारी वृत्तसेवा : एक कोटीचे कर्ज देण्याच्या आमिषाने २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाठार (ता.हातकणंगले) शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेच्या संस्थापक अध्यक्षासह दहा संचालकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणामुळे बँकेच्या सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे.

वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या संशियतांमध्ये शरण्या अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष सुरेश मारुती पाटील, उपाध्यक्ष रविंद्र बाळासो हिरुगडे, संचालिका नंदा आनंदा पाटील, विजय रंगराव कांबळे, आरती रवींद्र हिरुगडे, सुरय्या इस्माईल देसाई यांचा समावेश असून प्रज्ञा प्रविण भोसले, बाळासो शामराव पोवार, मच्छींद्र आणाप्पा कांबळे, महेश बाळासो शिंदे ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इतर संशयितांची नावे आहेत.

फसवणूक झालेल्यापैकी धन्यकुमार बाळासो मगदुम (रा.कोंडीग्रे,ता.शिरोळ) यांचा पॉवरलुमचा व्यवसाय आहे. कोरोनाकाळात या व्यवसायात त्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाची गरज होती. आर्थिक मदतीच्या शोधात असताना त्यांची इचलकरंजी येथील एका एजंटशी ओळख झाली. या एजंटने शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बॅक लि,वाठार तर्फ वडगाव येथून कर्ज मंजुर करुन देतो, असे सांगितले. या कर्जासाठीच्या कागदपत्रांची पुर्तता करुन घेतली. मे २०२२ पासून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फि, चेक फी, अर्जंट लोन फी, प्रॉमिसरी नोट फी, नोटरी करण्यासाठी रक्कम, सभासद सर्टिफिकेटसाठी रक्कम, अशी वेळो-वेळी रक्कम जमा करुन घेतली. यानंतर एक कोटी कर्ज मंजुर झालेचे सांगून मे २०२३ मध्ये १ लाख ३८ हजार रोख रक्कम भरून घेण्यात आली. कर्ज रक्कमेपैकी ४५ लाख रुपयेचे बँक ऑफ बडोदा,(शाखा -नागाव ) चा चेक दिला. व उर्वरित ५५ लाख रुपये रोख देणार असल्याचे सांगितले. ४५ लाख रुपयांचा चेक बँकेत वटवण्यासाठी भरला असता तो न वटता परत आला. पुन्हा यानंतर मगदूम यांना बँकेने ३० हजार रुपयांचा चेक दिला. तोही न वटता परत आला. यामुळे मगदूम यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वसंत मांगोरे यांच्यासह ५० सभासदांची २० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने संशयितांना अटक केली. यामुळे शरण्या निधी बँकेत गुंतवणूक केलेल्या सभासदांच्यात खळबळ माजली असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले, पोलिस उपनिरीक्षक गिरीष शिंदे करत आहेत.या संस्थेकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी वडगाव पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news