विशाळगडावर कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी

विशाळगडावर कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याच्या संरक्षित क्षेत्रात पशुबळीच्या जुन्या प्रथेला घालण्यात आलेल्या बंदीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पारंपारीक प्रथेला हायकोटनि दिलासा दिला. न्या. बी.पी. कुलाबावाला व न्या.एफ.पी. पुनावाला यांच्या खंडपीठाने विशाळगडावर पारंपारीक पध्दतीने १७ ते २१ जून हे चार दिवस पशुबळी (कुर्बानी) देण्यास परवानगी दिली.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय उपसंचालकांनी या विशाळगडावर पशुबळी प्रथा बंद करण्याच्या आदेशा विरोधात विशाळगडचे हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा ट्रस्टतर्फे अॅड. सतीश तळेकर यांनी याचिका दखल केली आहे. ही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशुबळी देण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करणारा अर्ज हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा ट्रस्टतर्फे अॅड. तळकर यांनी दाखल केला.

अर्जावर न्या. कुलाबावाला व न्या. पुनावाला यांच्या खंडपीठासमोर आज शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात आली. यावेळी अॅड. तळेकर यांनी विशाळगड परिसरातील दर्गा हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखली जाते. अकराव्या शतकात हा दर्गा बांधण्यात आला. येथे हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही धर्माचे बांधव भेट देतात. मशीद व मकबरा येथे आजही हिंदू व मुस्लिम बांधवांमार्फत पूजा केली जाते. दर्यात पशुबळी देणे ही अविभाज्य प्रथा असून सार्वजनिक ठिकाणी नव्हे तर खाजगी जागेवर या प्रथेचे पालन केले जात आहे.

प्राचीन काळी कोंबड्या, मेंढ्या, बकऱ्यांचा बळी देऊन गोरगरीबांना अन्नदान करण्याच्या हेतूने सुरू झालेली प्रथा कालांतराने धार्मिक प्रथा बनली आहे. मात्र उजव्या विचारसरणीच्या संघटना तसेच सत्ताधाऱ्यांच्या राजकीय फायद्यासाठी या प्रथेवर बंदी घालणारा आदेश जारी केला गेला, याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. प्रथेवर घालण्यात आलेली बंदी १७ ते २१ जून दरम्यान विशाळगडावर चालणाऱ्या उत्सवावेळी उठवावी अशी विनंती केली. ही विनंती मान्य करत खंडपीठाने चार दिवस कुर्बानीला परवानगी दिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news