कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी मंगळवारी दैनिक 'पुढारी'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. दैनिक 'पुढारी'चे संस्थापक-संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
दैनिक 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव, सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, वितरणचे सरव्यवस्थापक सुनील लोंढे यांनी शाहू महाराज यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार, मतदारसंघातील तयारी, विविध समस्या, प्रश्न, त्यावरील भूमिका आदींबाबत शाहू महाराज यांनी संवाद साधला.
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, नितीन जाधव आदी उपस्थित होते.