राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे ‘जिल्‍हा बँके’साठी १०१ ठरावधारक घेऊन शक्तीप्रदर्शन | पुढारी

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे 'जिल्‍हा बँके'साठी १०१ ठरावधारक घेऊन शक्तीप्रदर्शन

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली. मात्र यात कोणताही निर्णय झाला नाही. तर दोघांनी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर काेल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेसाठी ( केडीसी ) आज
( दि २९ ) राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी १०१ ठरावधारकांबरोबर घेऊन जयसिंगपूर येथे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ठरावधारकाना घेऊन वाहने कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत.

दरम्यान रविवारी झालेल्या बैठकीत सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी माझ्याकडे ११० ठरावधारक आहेत. मी माघार घेणार नसल्याचे सांगत चर्चा फिस्कटल्याचे समजते. गेल्या दोन महिन्यांपासून शिरोळ तालुक्यात ‘केडीसी’साठी राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्याविरोधात सर्वपक्षीयांनी गणपतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिरोळ दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचेच असल्याने मोठी रंगत आली आहे. त्याचबरोबर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याने राजकीय दिशा बदलली आहे.

रविवारी प्रथम गणपतराव पाटील व राजू शेट्टी यांच्याशी मंत्री मुश्रीफ यांनी चर्चा केली त्यांनतर ना. यड्रावकर यांच्याशीही ना.मुश्रीफ यांनी चर्चा केली. मात्र दोघीही केडीसीसाठी सेवा संस्था गटातून अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.  यड्रावकर यांनी सोमवारी सकाळी १०१ ठरावधारकाना बरोबर घेऊन शक्तिप्रदर्शन करून दोन बस भरून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी व गणपतराव पाटील यांनीही घेतला अर्ज

राजू शेट्टी यांच्यासह सर्वपक्षीय यांनी पुढाकार घेऊन गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. अशातच आज सोमवारी सकाळी राजू शेट्टी व गणपतराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button