कोल्हापूर : सोने-चांदी दरात घसरण | पुढारी

कोल्हापूर : सोने-चांदी दरात घसरण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मागील आठवड्यात सोने-चांदी दरात झालेल्या उच्चांकी वाढीत या आठवड्यात मात्र घट झालेली पाहायला मिळाली. सणाच्या हंगामानंतर सुरू झालेल्या लग्नसराईमुळे ज्यांचे यंदा कर्तव्य आहे, अशांसाठी मात्र ही बाब दिलासादायक ठरणारी आहे. आठवडाअखेर प्रति 10 ग्रॅम सोने 1 हजार 100, तर प्रतिकिलो चांदी दरात 2 हजार 800 रुपयांची घसरण झाली आहे. आज सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49 हजार 700 इतका असून प्रति किलो चांदीचा दर 63 हजार 200 इतका आहे.

लॉकडाऊनमध्ये मंदीच्या काळात सराफ बाजारात तेजी असल्याचे दिसून आले आहे. सातत्याने सराफ बाजारातील तेजीत वाढ होत असताना मंगळवारी अचानक घसरण झाली. मागील आठवड्यात 50 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर होता, तर 66 हजार प्रतिकिलो चांदीचा उच्चांकी दर होता. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात घसरण झाल्याने सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांकडून देण्यात आली.

हेही वाचलं का?

Back to top button