कोल्हापूर : सागरी माशांची आवक वाढली | पुढारी

कोल्हापूर : सागरी माशांची आवक वाढली

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पावसाळी वातावरणामुळे गेल्या आठवड्यात कमी झालेली सागरी माशांची आवक पूर्ववत झाली आहे. मात्र, दरात फारसा चढ-उतार झालेला नाही. मटणाचे वाढलेले दर स्थिर असून ब्रॉयलर चिकनचे दर उतरल्याची माहिती व्यावसायिक प्रदीप घोटणे यांनी दिली.

मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने मटणाचे दर 600 रुपयांवरून 640 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. ब्रॉयलर चिकन 160 ते 200 रुपयांवरून 140 ते 160 रुपये प्रतिकिलो झाले आहे. अंडी 65 रुपये डझन, खडकी अंडी 100 रुपये डझन, लेगावन कोंबडी 200 ते 220 रुपये नग, खडकी कोंबडी 300 ते 500 रुपये नग दर आहे.

मच्छी बाजारात पापलेट, झिंग्याची आवक वाढली आहे. इतर माशांचीही आवक वाढण्याची शक्यता आहे. आवक वाढली, तर दर उतरणार असल्याचे घोटणे यांनी सांगितले. मच्छी बाजारात छोटी सुरमई 400, मोठी सुरमई 600 ते 700 रुपये प्रतिकिलोचा दर आहे. पापलेट 800 ते 1200, बांगडा 200 ते 240, झिंगा 500 ते 800, सागरी खेकडा 300, शिंपल्या 250 ते 300, गेदर 200 ते 300, कोकारी मासा 300, पालू (रावस) 200 ते 300, सरंगा 500 ते 600, सोंदळी मासा 300 ते 320, शेतके मासा 300 ते 400 प्रतिकिलोचा दर आहे.

नदीतील पाणगा 300 ते 320, मरळ 400, टिलाप 120 ते 200, रहू 160 ते 200, कटला 120 ते 300, तांबर 160 ते 200, वाम मासा 100 ते 300 रुपये नगर, वंझा मासा 200 ते 300 रुपये प्रतिकिलोचा दर असल्याची माहिती घोटणे यांनी दिली.

हेही वाचलं का?

Back to top button