ओळख वारसास्थळांची...राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस) | पुढारी

ओळख वारसास्थळांची...राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस)

कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यावेळी कागलकर घाटगे कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे मुक्कामी होते. आज ही वास्तू ‘राजर्षी शाहू जन्मस्थळ’ म्हणून ओळखली जाते.

जयसिंगराव घाटगे व राधाबाई घाटगे या दाम्पत्यांच्या पोटी यशवंतराव यांचा जन्म झाला. कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्?नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले. त्यांचे नामकरण ‘शाहू’ असे करण्यात आले. येथील लाल मातीच्या आखाड्यात त्यांनी कुस्ती, शिवकालीन युद्धकला अशा रांगड्या खेळांचा सराव केला.

राजर्षी शाहूंनी इसवी सन 1889 ते 1893 या काळात धारवाड येथे तर पुढील शिक्षण राजकोटमध्ये घेतले. सर फ—ेझर व रघुनाथराव सबनीस यांच्यासारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थी दशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र आदी विषयांचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना 2 एप्रिल 1894 ला राज्याधिकार प्राप्त झाला. येथे राजर्षी शाहूंच्या जीवन कार्याची माहिती देणारे व्यापक संग्रहालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
(समाप्त)

पाहा व्हिडिओ : पन्हाळ्याचा ऐतिहासिक तीन दरवाजा | जागतिक वारसा सप्ताह विशेष

Back to top button