कोल्हापूर जिल्हा बँक रणधुमाळी डिसेंबरमध्येच रंगणार? | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक रणधुमाळी डिसेंबरमध्येच रंगणार?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुबंई उच्च न्यायालयाने गुरूवारी दिले. न्यायालयाचा अंतीम आदेश अध्याप सहकार विभागाकडे आलेला नाही. सोमवारी (दि. २९) निवडणूक कार्यक्रम जाहीर होवून डिसेंबरअखेर मतदान आणि मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपली आहे. पण कोरोनामुळे सर्वच निवडणूका लांबणीवर पडल्या. राज्यातील १८ जिल्हा बँकांची लगबग सुरू झाली.

कोल्हापूर जिल्हा बँक : कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधूदूर्ग आणि पुणे जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया एकाच वेळी सुरू

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधूदूर्ग आणि पुणे जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली. कोल्हापूर जिल्ह्या बँकेची २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली होती.

सहकार प्राधिकरणाकडे निवडणूक कार्यक्रमही सहकार विभागाने सादर केला होता.

परंतू कटऑफ डेटसह मतदार यादीतून वगळल्याच्या कारणास्तव सुमारे ६०हून अधिक संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ऑक्टोबर महिन्यात सर्व सुनावणी प्रक्रिया पूर्ण होवून निकाल येणे बाकी होता.

निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन निवडणुका घेण्याचे निर्देष

दरम्यान, बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी आजरा तालुक्यातील मडीलगे येथील सेवा संस्थेना दाखल केलेल्या याचीकेवर  आज सुनावणी झाली.

यावर न्यायालयाने तत्काळ निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन निवडणुका घेण्याचे निर्देष दिले आहेत.

याचिकाकर्ते संस्थेतर्फे जी. एम. नाईक, बँकेतर्फे रवि कदम या वकिलांनी युक्तिवाद केला.

Back to top button