कोल्हापूर : यड्रावकर गट सतेज पाटील यांच्या सोबत | पुढारी

कोल्हापूर : यड्रावकर गट सतेज पाटील यांच्या सोबत

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेचे उमेदवार ना. सतेज पाटील यांनी रविवारी शिरोळ, जयसिंगपूर येथील यड्रावकर गटाच्या नगरसेवक मतदारांची भेट घेतली. यावेळी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गट व मतदार सतेज पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे आश्वासन उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी दिले.

ना. यड्रावकर गटाची भूमिका महाविकास आघाडीच्या उमेदवार ना. सतेज पाटील यांना पाठबळ देणारी आहे. या निवडणुकीमध्ये ना. पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे संजय यड्रावकर यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मदन कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. भेटी दरम्यान मा. नगराध्यक्षा स्वरूपाताई पाटील -यड्रावकर, सभापती दीपाली परीट, जि.प. सदस्या परविन पटेल यांच्यासह शिरोळ, इचलकरंजी, जयसिंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.

पाहा व्हिडिओ : आठ दिवस टिकणाऱ्या मटण लोणच्याची रेसिपी

 

Back to top button