MLC Election: मंत्री सतेज पाटील यांचे स्वागत भाजपच्या माजी नगराध्यक्षाकडून... | पुढारी

MLC Election: मंत्री सतेज पाटील यांचे स्वागत भाजपच्या माजी नगराध्यक्षाकडून...

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : MLC Election : राज्यात विधान परिषद निवडणूकीसाठीच्या (MLC) प्रचाराची रणधुमाळी गतिमान झाली आहे. विधान परिषदेचे कोल्हापूरातील आमदार आणि विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि मतदारांची भेट घेण्याला जोर वाढवला आहे.

शनिवारी माजी.आम महाडिक यांनी दौरा केल्यानंतर, आज रविवारी पालकमंत्री पाटील यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी नगराध्यक्ष जयराम पाटील आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्याही निवासस्थानी भेट दिली. (MLC Election)

या भेटीगाठी दरम्यान पाटील यांनी, भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. त्यावेळी डांगे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या. डांगे यांनी गत विधानपरिषद निवडणूकीत (MLC) माजी आम. महादेवराव महाडिक यांना समर्थन दिल्याने, त्यांच्यावर राष्ट्रवादीने कारवाई केली होती.

पालकमंत्री पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देत, बंद खोलीत जवळपास 20 मिनिटे चर्चा केली. या भेटीमुळे शिरोळ तालुक्यात विविध तर्क-वितर्क लढवले जात होते.

दरम्यान या दौऱ्यात पालकमंत्री पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनीही हजेरी लावली होती. यावेळी मंत्री पाटील आणि जाधव यांच्यात गोकूळच्या संचालकपदाबाबत चर्चा झाल्याची चर्चा आहे. (MLC Election)

हे ही वाचा :

Back to top button