विधानपरिषद निवडणूक : राजकीय हालचालींना वेग, सतेज पाटील इचलकरंजी दौर्‍यावर - पुढारी

विधानपरिषद निवडणूक : राजकीय हालचालींना वेग, सतेज पाटील इचलकरंजी दौर्‍यावर

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इचलकरंजीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची पालकमंत्री सतेज पाटील शनिवारी भेट घेणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री पाटील यांच्या दौर्‍याचे नियोजन करण्यात आले आहे.

एक गठ्ठा मतदान असलेल्या इचलकरंजी पालिकेवर नजर असणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत तब्बल 67 जणांना मतदानाचा हक्‍क मिळणार आहे. पालकमंत्री पाटील या दौर्‍यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नगरसेवकांची भेट घेणार आहेत. ताराराणी आघाडीतील नगरसेवकांशीही ते संवाद साधणार आहेत. आ. प्रकाश आवाडेसमर्थक नगरसेवकांची मंत्री पाटील भेट घेणार काय, याची उत्सुकता असणार आहे.

Back to top button