कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : चीन (हाँगझोऊ) येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत रोलर स्केटिंगमध्ये 3000 मीटर रिलेत कोल्हापूरच्या विक्रम इंगळे याने कांस्य पदकावर मोहर उमठविली आहे. तसेच त्याने 1000 मीटरमध्ये स्केटिंग वैयक्तिक प्रकारात चौथे स्थान पटकाविले. (Asian Games 2023)
मुळचा कोल्हापूरचा असलेला विक्रम सध्या पुणे येथे स्थायिक आहे. विक्रम सहा वर्षाचा असल्यापासून स्केटिंग करीत आहे.
स्केटिंगमध्ये विक्रम यांने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करावे. यासाठी वडील राजेंद्र इंगळे यांनी पुणे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी विक्रमला कोल्हापुरातील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्रात 6 वर्षाचा असताना दाखल केले. आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा. डॉ. महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्केटींग रिंगवर सराव केला. यावेळी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी करून पदकांवर नाव कोरले. विक्रमसह त्याच्या बहिणी पल्लवी व प्रिती यानीही विविध स्पर्धेत चमक दाखविली आहे. (Asian Games 2023)
विक्रमने विविध स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांना गवसणी घातली आहे. त्यांचे वडील कै. राजेंद्र इंगळे हॉटेल व्यवसायात होते. स्केटिंगमधील त्याची चमकदार कामगिरी पाहून त्यांनी विक्रमला पुणे येथे प्रशिक्षणासाठी घातले. उचगाव येथे विक्रमचे तीन चुलते आहेत. तर आई व दोन्ही बहिनी पुणे येथे स्थायिक आहेत. हॉटेल मालकाच्या पोराची ही भरारीने कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला उंची देणारी आहे. (Asian Games 2023)
हेही वाचा :