MLA Rohit Pawar : नोटबंदीवरून रोहित पवारांचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतला चांगलाच समाचार | पुढारी

MLA Rohit Pawar : नोटबंदीवरून रोहित पवारांचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतला चांगलाच समाचार

पुढारी ऑनलाईन डेस्क

पाच वर्षांपुर्वी मोदी सरकारकडून नोटबंदीची घोषणा करण्यात आली. या नोटबंदीतून काही साध्य झाले नसल्याचे सांगत विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मोदी सरकारने नोटबंदी केल्यानंतर ज्या काही घोषणा केल्या होत्या त्यातील एकही गोष्ट साध्या झाली नसल्याचा दावा राज्यातील विरोधकांकडून करण्यात येत आहे. (MLA Rohit Pawar)

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. यावर ते ट्रोल होताना दिसले. त्यांनी नोटबंदीच्या विरोधात ही पोस्ट केली. यामध्ये त्यांनी नोटबंदीनंतर संपूर्ण देश आधी रांगेत उभा राहिला आणि नंतर रांगायला लागला… आता तो उठून चालायला आणि नंतर धावायला लागेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुयात!#Demonetisation अशा आशयाची पोस्ट केली आहे. ट्विटर आणि फेसबुकवर पवारांचा नेटकऱ्यांनी चांगल्याच शब्दांत समाचार घेतला आहे.

MLA Rohit Pawar : ते स्वराज्य ध्वजाच नाटकं भारी जमलं बरका

यातील एका नेटकऱ्यांने शेतकऱ्यांप्रती भावना व्यक्त आमदार पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे. हो ते मान्यच आहे, पण तुम्ही राज्यकडेही बघा जरा, शेतकरी बांधावर, कष्टकरी कामावर, विद्यार्थी परीक्षेच्या गोंधळात, आणि एसटी कर्मचारी उपाशी रडतोय. आणि काय कौतुक सांगावं आम्ही तुम्हाला….? मध्यंतरी ते स्वराज्य ध्वजाच नाटकं भारी जमलं बरका अशा अनेक कमेंट्स रोहित पवारांच्या ट्विटर आणि फेसबुकवर नेटकरी देत आहेत.

मागच्या चार महिन्यांपुर्वी राज्यातीन अनेक जिल्ह्यांत महापुराचा मोठा फटका बसला. यामध्ये हजारो हेक्टर जमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाले. यासाठी महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना लवकर मदत केली जाईल अशी घोषणा केली होती. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी नाराज असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, रोहित पवारांनी केंद्राच्या धोरणांपेक्षा राज्यातील आणि मतदार संघातील धोरणांकडे लक्ष द्या, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

Back to top button