कोल्हापूर : गुंगीचे औषध फवारून दानोळीत दोन घरांत तीन लाखांची चोरी | पुढारी

कोल्हापूर : गुंगीचे औषध फवारून दानोळीत दोन घरांत तीन लाखांची चोरी

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : येथील गुंगीचे औषध फवारून दोन घरांतून तीन लाखांची आणि त्याच्या शेजारी लागून असणाऱ्या तीन घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचे आज उघडकीस आले. मंगळवारी (दि.२) रोजी मध्यरात्री झालेल्या या चोरीमुळे ऐन दिवाळीत दानोळीसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

या चोरीत जीवन कांबळे यांच्या घरातील तिजोरी फोडून दीड तोळे घंटन, कर्ण फुले आणि चेन असा तीन तोळे मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर विनायक कांबळे यांच्या घरातील तिजोरी फोडून सतरा हजार रुपये रोख रक्कम लंपास केले.

दरम्यान, याच्या घराला लागून असणारे महावीर मगदूम, नागेश संगपाळ आणि विश्वनाथ खोंड यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. पण चोरट्यांच्या हाती काहीच मुद्देमाल लागला नाही.

कांबळे कुटुंबातील दोन्ही घरात झोपलेल्या एकाही सदस्याला जाग आली नाही. सकाळी उठल्यावर सुद्धा त्यांच्या डोळ्यावर झापड होती. त्यामुळे गुंगीचे औषध फवारून चोरी केली असेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास जयसिगपूर पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : बघता बघता सुंदर रांगोळी काढणाऱ्या कलाकाराची ग्रेट भेट 

Back to top button