कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर झाड कोसळले; वाहतूक एक तास ठप्प | पुढारी

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर झाड कोसळले; वाहतूक एक तास ठप्प

दोनवडे : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर–गगनबावडा रस्त्यावर दोनवडे (ता. करवीर) फाट्यावर सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बुधवारी (दि.३१) दुपारी दोन वाजता झाड कोसळले. यामध्ये एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. गोवा राज्यासह गगनबावडा, तळेरे, तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह तळ कोकणात जाणारी वाहतूक तब्बल एक तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे दोनवडे येथे शंभर वर्षापेक्षा जुने पिंपळाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हे झाड पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाडाखाली लावलेल्या दुचाकीवर मध्यभागी झाड पडले. दुचाकीचा चक्काचूर झाला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान वाहतूक साबळेवाडी-खुपिरे व दोनवडे-वाकरे मार्गे सुरू होती

हेही वाचा : 

Back to top button