टेंबलाई उड्डाणपुलाजवळ हुक्का पार्लर वर छापा - पुढारी

टेंबलाई उड्डाणपुलाजवळ हुक्का पार्लर वर छापा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : टेंबलाई उड्डाणपुलानजीक रुक्मिणीनगरात असणार्‍या हुक्का पार्लर वर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून मालकासह 14 जणांना ताब्यात घेतले. हॉटेल स्कोअरमध्ये मालक कुलदीप जयवंतराव चव्हाण (वय 40, रा. लक्ष्मीपुरी) हा बेकायदेशीररीत्या हुक्‍का पार्लर चालवत असल्याचे दिसून आले. हॉटेलमधून 30 हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

रुक्मिणीनगरमध्ये हॉटेल स्कोअरमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. यावेळी वेगवेगळ्या हुक्‍का पॉटद्वारे हुक्‍का पिणारे 13 जण मिळून आले. मालकासह सर्वेश संतोष चव्हाण (वय 26), अक्षय महेश ठक्‍कर (27), सौरभ संजय पेटकर (25, तिघे रा. रॉयल पान 5 वर

ग्रीनफिल्ड अपार्टमेंट, नागाळा पार्क), धनाजी रामराव थोरात (40, जवाहरनगर), सनी रुपेश सलोजा (24, ताराबाई पार्क), रोहित राजकुमार पंचुडिया (27, रा. शाहूपुरी), सुशील चंदुलाल ओसवाल (नलवडे कॉलनी, राजारामपुरी), उत्कर्ष उत्तम दुधाणे (29, आर. के.नगर), पिुयष राजू बाफना (31, वर्षानगर), विजय जयंतीलाल राठोड (26, प्रतिभानगर), राहुल दिलीप राठोड (वर्षानगर), इंद्रजित भारत म्हाळूंगे (29, रा. तोडकर गल्‍ली, गडहिंग्लज) व संदीप तानाजी भालेकर (38, टाकाळा, माळी कॉलनी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हॉटेलमधून आठ हुक्‍का पॉट, वेगवेगळ्या कंपनीचे सुगंधी तंबाखू असे साहित्य जप्‍त केले.

Back to top button