कोल्‍हापूर : महिलांचे दागिने हिसकावणार्‍या ‘बंटी-बबलीला’ बेड्या - पुढारी

कोल्‍हापूर : महिलांचे दागिने हिसकावणार्‍या ‘बंटी-बबलीला’ बेड्या

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा

मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून पोबारा करणार्‍या बंटी-बबली जोडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अल्फाज आप्पासो जमादार (वय 28) व रुपाली उर्फ जोया अल्फाज जमादार (दोघे रा. आळते, हातकणंगले) अशी नावे आहेत. जवाहरनगर, शिंगणापूर, पाडळी खुर्द येथे गुन्हे केल्याची दोघांनी कबुली दिली.

19 ऑक्टोबरला जवाहरनगरातील महिलेचे दागिने हिसकावल्याचा प्रकार घडला होता. संशयित हा पांढर्‍या रंगाच्या मोटारसायकलवरुन हेर्लेजवळ येणार असल्याची महिती उपअधीक्षक प्रिया पाटील यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचला होता. पोलिसांना मिळालेल्या वर्णनाचा संशयित तेथे येताच त्याला ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात दीड ग्रॅमची कानातील रिंग मिळून आली.

चौकशीत त्याने स्व:ताचे नाव अल्फाज जमादार सांगितले तसेच जवाहरनगर येथे महिलेच्या रिंगा हिसकावल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात पत्नी रुपाली जमादार सहभागी असल्याचे सांगितले. यावरुन दोघांनाही अटक तीन रिंगा, मोटारसायकल असा 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Back to top button