कोल्हापूर : घोसरवाडमधील शेतक-याच्या केळींची थेट ओमानला निर्यात | पुढारी

कोल्हापूर : घोसरवाडमधील शेतक-याच्या केळींची थेट ओमानला निर्यात

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा

घोसरवाड (ता. शिरोळ) येथील प्रयोगशील शेतकरी विद्यासागर बारवाडे यांच्या शेतातील केळी आखाती देशातील ओमन देशात निर्यात होत असून गेल्या पंधरा दिवसात पाच वेळा केळी ओमनला पाठवण्यात आली.

ऊस या पारंपारिक शेतीला फाटा देऊन घोसरवाड (ता. शिरोळ) येथील विद्यासागर बारवाडे यांनी आपल्या दोन एकर शेतात केळी उत्पादन घेतले आहे. त्यांनी दहा महिन्यापूर्वी चांगले कंपनीचे बियाणे आणून त्याची लावण केली आहे दोन्ही बाजूला ठिबक सिंचनद्वारे पाणी, खते यांचा योग्य वापर करून केळीचे उत्तम उत्पादन घेतले आहे.

एकरी सरासरी ३५ ते ४० टन केळीचे उत्पादन होत असून त्याला साडेनऊ हजार पासून तेरा हजार पर्यंत दर मिळत आहे. यातून बारवाडे यांना एकरी चार लाखापेक्षा जास्त उत्पादन अपेक्षित आहे. नोवा या कंपनीबरोबर करार करून केळी निर्यात होत असून कंपनी शेतात येऊन केळी विकत घेत आहे. यामध्ये कंपनीचे वीस कामगार शेतात प्रत्यक्ष येऊन केळीचा घड ताब्यात घेऊन तो स्वच्छ करून केळीच्या फण्या कापून सात सात किलोचे बॉक्स पॅकिंग करत आहेत. त्यानंतर कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून पंधरा दिवसात हि केळी निर्यात केले जात आहेत.

उसाला दीड ते पावणे दोन वर्ष लागतात, त्यापेक्षा दहा महिन्यात केळीचे पीक तयार होऊन ऊस पिकापेक्षा दुप्पट उत्पादन मिळते. त्यामुळे आम्ही केळी उत्पादन घेण्याचे ठरवले. शेतकऱ्यांना याबद्दल काही माहिती पाहिजे असल्यास आपल्याशी संपर्क साधावा.
विद्यासागर बारवाडे

Back to top button