सचिन चव्हाण यांची कोल्हापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी निवड | पुढारी

सचिन चव्हाण यांची कोल्हापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी निवड

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी सचिन चव्हाण यांची निवड झाली. सचिन यांचे वडील काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या जागी ही निवड करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सचिन यांना निवडीचे पत्र दिले.

सचिन चव्हाण हे १९९० पासून एनएसयुआयमधून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. महाविद्यालयीन जीवनात विवेकानंद कॉलेजचे जनरल सेक्रेटरी त्यानंतर विद्यापीठ कौन्सिलचे चेअरमन होते. २०१०-१५ या कालावधीत ते महापालिकेचे नगरसेवक होते. चव्हाण हे काँग्रेसचे शहर समन्वयक म्हणून गेली तीन वर्षे कार्यरत होते. प्रल्हाद चव्हाण हे गेली २५ वर्षे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. माजी महापौर सागर चव्हाण यांचे बंधू व माजी नगरसेविका जयश्री चव्हाण यांचे सचिन हे पती आहेत.

Back to top button