गारगोटी : पुढारी वृत्तसेवा: अंतुर्ली येथे महसूल विभागाच्या पथकाने बेकायदेशीर बॉक्साइट उत्खनन व वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली. यावेळी दोन हायवा डंपर व एक पोकलॅन मशीन असा सुमारे 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तहसिलदार
अश्विनी अडसुळ यांनी ही धाडसी कारवाई केली. महसूल विभागाच्या कारवाईने बॉक्साइट तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
पश्चिम भुदरगड परिसर हा जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. या परिसरात जैविविधतेबरोबरच मुबलक बॉक्साइट साठा आहे. त्यामुळे बॉक्साइट तस्करांचा डोळा नेहमीच या परिसरावर आहे. पाटगाव परिसरातून बेकायदेशीर बॉक्साइट उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती तहसिलदार अश्विनी अडसुळ व महसूल विभागाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने पाळत ठेऊन आज (दि.२४) पहाटे 1.30 च्या सुमारास अंतुर्ली येथे छापा टाकला. यावेळी या टोळीला रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून पोकलॅन मशीन व बॉक्साइटने भरलेल्या दोन हायवा डंपर असा सुमारे 70 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
हेही वाचा