कोल्हापूर : अंबाबाई किरणोत्सवात तिसर्‍या दिवशीही अडथळा | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई किरणोत्सवात तिसर्‍या दिवशीही अडथळा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ढगाळ वातावरणामुळे सलग तिसर्‍या दिवशी अंबाबाई मंदिरात किरणोत्सव होऊ शकला नाही. बुधवारी अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत किरणे येण्याचा अंदाज होता. मात्र, ढगांमुळे किरणे मंदिरात पोहोचू शकली नाहीत. गुरुवारी अखेरचा दिवस आहे.

अंबाबाई मंदिरात पारंपरिक किरणोत्सवाच्या तारखा उत्तरायणासोबत जोडलेल्या आहेत. 27 फेब—ुवारीपासूनच किरणोत्सवाचा अभ्यास सुरू आहे. यंदा 27, 28 व 29 जानेवारीला देवीच्या कमरेपर्यंत किरणे पोहोचली. 30 जानेवारीला चेहर्‍यावर, 31 जानेवारीला खांद्यापर्यंत, तर बुधवारी गुडघ्यापर्यंत किरणे येणे अपेक्षित होते. सायंकाळी साडेपाचनंतर सूर्य ढगाआड जाण्याला सुरुवात झाली. तसेच हवेत धुक्याचे प्रमाण असल्याने किरणे पितळी उंबर्‍यापर्यंतही येऊ शकली नाहीत. गुरुवारी (दि. 2) किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी किरणे देवीचे चरण स्पर्शून डावीकडे लुप्त होतात, असे अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.

Back to top button