वडगाव : लाचप्रकरणी पोलिसासह दोघांना अटक | पुढारी

वडगाव : लाचप्रकरणी पोलिसासह दोघांना अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे खोटे सांगून आणि गुन्ह्यात मदत तसेच एफआयआर प्रत देण्यासाठी पाच हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या वडगाव पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलसह दोन पंटरना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले.

पोलिस कॉन्स्टेबल अशोक कृष्‍णा जाधव पंटर चेतन गावडे (रा. कोरेगाव, तालुका वाळवा) आणि प्रीतम दीपक ताटे (रा. वडगाव, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी वडगाव (ता. हातकणंगले) येथे कारवाई केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार व्यक्ती वडगाव परिसरात राहते मटका जुगार केस आपल्या विरुद्ध दाखल आहे असे खोटे सांगून संशयिताने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयाची मागणी केली होती. तसेच या गुन्ह्यात मदत करण्याबरोबर दाखल गुन्ह्याची मूळ प्रत घेऊन देतो असेही त्यांनी सांगितले होते. संशयितांच्या बोलण्याविषयी तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने सायंकाळी छापा टाकून पाच हजार रुपयांची रक्कम घेताना पंटर दीपक ताटे यास रंगेहात पकडण्यात आले.

Back to top button