कोल्‍हापूर : हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा; दोन निवडणुकांनंतर... | पुढारी

कोल्‍हापूर : हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा; दोन निवडणुकांनंतर...

कागल, पुढारी वृत्तसेवा : कागल येथे आयोजित महामेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोळा हजार वैद्यकीय विमा सुरक्षा कार्डाचा वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्‍यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्‍हणाले, कागल विधानसभा मतदारसंघातून पुढील दोन निवडणुका लढवणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्री होईन.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी रुंदावत आहे. गरिबांच्या सेवेचे वृत्त गेल्या 30 वर्षापासून अखंडपणे आम्‍ही जपत आलो आहे. गरिबांशी माझी नाळ जुळलेली आहे. येत्या विधानसभेच्या आणखीन दोन निवडणुका लढवून विजय होणार आहे. आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्रीदेखील होणार आहे. लोकांची शक्ती जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी कोणालाही घाबरत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • हेही वाचा 

शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकातला किडा होऊ नका : पुरुषोत्तम बेर्डे

अजित पवारांना कुंकवाची अ‍ॅलर्जी, तरीही पुरवला चिमुकलीचा हट्ट; सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

गडचिरोली : ‘उमेद’च्या प्रक्रिया उद्योगाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

Back to top button