कुरुंदवाड येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा; ९ जण ताब्यात - पुढारी

कुरुंदवाड येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा; ९ जण ताब्यात

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : येथील माळभागावरील एका घरात ऑनलाइन जुगार अड्ड्यावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकून 8 जणांना ताब्यात घेतले.

37 हजार 870 रुपये 8 मोबाईल संच, 4 मोटारसायकल, 10 कॉम्प्युटर असा एकूण चार लाख 94 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री सुमारास ही कारवाई झाली आहे.

याप्रकरणी अजित पोमाजे हा स्वतःचे फायदयाकरीता विनलकी या अपव्दारे कसिनो नावाच्या ऑनलाईन खेळावर लोकांकडून पैसे घेवून त्यांना पॉईट स्वरूपात ऑनलाईन कॉम्प्युटरवर बॅलन्स देवून जिंकणा-या इसमास 2 रुपयास 70 रुपये याप्रमाणे पैसे देवून ऑनलाईन जुगार खेळवीत व खेळत होता.

यावेळी चंद्रकांत माने (वय 40) मोहन कोरवी ( वय 36), विजय कागले (वय 52), सुनील सासणे ( वय 38), ओंकार चौगुले (वय 22), संजय चौगुले (वय 28), बंडू नाईक ( वय 35), नबीलाल पेंडारी ( वय 35) या 9 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. या 9 जणांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, पो.हे कॉ शिवाजी पडवळ, रणजित पाटील, पोलिस नाईक संजय चाचे, अनमोल पोवार, महेश गवळी यांच्या पथकाने केली.

Back to top button