कोल्हापूर : आमचं ठरलयं नंतर आता ‘गुड न्यूज’ ची चर्चा ! काय आहे भानगड?

कोल्हापूर : आमचं ठरलयं नंतर आता ‘गुड न्यूज’ ची चर्चा ! काय आहे भानगड?
Published on
Updated on

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : जयसिंगपूर गुड न्यूज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक व पालिका निवडणुक तोंडावर असतानाच जयसिंगपूर शहरातील अनेक चौकात गुड न्यूज आहे अशा अशयाचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोशल मिडीयावरही या फलकांचा खैंदूळ (धुमाकूळ) उडाला आहे. त्यामुळे अनेकांची झोप उडाली असून, शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे फलक लावले कोणी हे कोणालाच माहीत नसले तरी त्याचे संदर्भ आपापल्या परीने लावले जात आहेत.

जयसिंगपूर शहरात राजकीय फलकांची जागा गुड न्युज आहे या अनाकलनीय फलकांनी घेतल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता लागून राहीली आहे. जिल्हा बँक निवडणूकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्याच्या राजकारणात जोरदार फिल्डींग लागलेली असताना अशा काळात शहरातील हे फलक कोणते सूचक विधान तर करत नाही ना असाही असाही सूर निर्माण झाला आहे.

शहरात रात्रीत गुड न्युजचे फलक

शहरात रात्रीत गुड न्युज आहे हे फलक लागले. सकाळी नागरिकांना याचा कोणताच अर्थबोध झाला नाही. राजकीय राखीव फलकांच्या जागेवर या फलकांनी सध्या शहरात चर्चेचे रान उठविले आहे. शहरात अशा प्रकारचे फलक प्रथमच लागले. कोणत्या कंपनीचे मोठे शोरूम होत नाही की शहरात नवीन काही जाहिरातबाजी करण्यापूर्वीचा हा फंडाही नाही. पितृ पंधरवड्यात असे नवीन काही होईल याची शक्यताही नसताना गुड न्युज आहे फलकांनी शहरात नव्या चर्चेला उधान आले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील राजकारण नव्या वळणावर पोहोचले आहे. सोशल मीडियावर आव्हाने दिली जात असताना शहरातील हे फलक जिल्हा बँकेच्या सूचक घडामोडींकडे लक्ष वेधत आहेत.

गुड न्युज आहे यांचा खुलासा होणारे फलक उभारणार का आणि त्याचे संदर्भ काय असतील याची उत्सुकता लागून राहील आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news