कोल्हापूर : राज्यपाल भवनकडून कुलगुरूंना यादी प्राप्त; नऊ जणांचा समावेश | पुढारी

कोल्हापूर : राज्यपाल भवनकडून कुलगुरूंना यादी प्राप्त; नऊ जणांचा समावेश

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर 9 जणांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली आहे. यात कोल्हापुरातून प्रा.डॉ.घनश्याम दीक्षित, शहनील देसाई-महागावकर, काव्यश्री नलवडे यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील श्रीनिवास ऊर्फ विशाल गायकवाड व संजय परमणे या माजी अधिसभा सदस्यांची राज्यपालांकडून सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यपाल भवनातून याबाबतचे पत्र मंगळवारी कुलगुरूंना प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठ निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यात शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने बाजी मारली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता विद्यापीठ कार्यक्षेत्रात होती. अधिसभेवर काही सदस्य पदवीधर, शिक्षक यातून निवडून जातात. काही सदस्यांची नियुक्ती कुलपती (राज्यपाल) करतात. त्यानंतर मंगळवारी राज्यपाल भवनातून नियुक्त सदस्यांची नावे पत्राद्वारे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांना पाठवण्यात आली. राज्यपालांचे मुख्य सचिव संतोष कुमार यांनी याबाबतचे पत्र पाठवले आहे.
यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शहनील फत्तेसिंह देसाई-महागावकर, डॉ.घनश्याम दीक्षित, काव्यश्री नलवडे तर सांगली जिल्ह्यातून श्रीनिवास ऊर्फ विशाल गायकवाड, संजय परमणे, डॉ. मनोजकुमार पाटील, वनिता तेलंग यांची नियुक्ती करण्यात आली. तर सातारा जिल्ह्यातून सारंग कोल्हापुरे, सुजित शेडगे यांची नियुक्ती झाली आहे.

Back to top button