ED raids NCP leader Hasan Mushrif : कागलमध्ये तणाव, मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांचे कडे तोडले (VIDEO) | पुढारी

ED raids NCP leader Hasan Mushrif : कागलमध्ये तणाव, मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांचे कडे तोडले (VIDEO)

कागल; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीचे छापे पडले. त्याच्या निषेधार्थ मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. पोलिसांचे कडे तोडून हजारो कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे कूच केली. मात्र पोलिसांनी निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांना अडवले.

यावेळी आक्रमक झालेले कार्यकर्ते गैबी चौकात एकत्र येऊन भाजप सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कागल शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आमदार मुश्रीफ यांचे निवासस्थान ते गैबी चौक दरम्यान कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत.

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावर आज (दि.११) सकाळी सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी) छापे  टाकले. या कारवाईनंतर कागल शहरातील राष्‍ट्रवादी काँग्रेसचे  कार्यकर्ते आक्रमक झाले. त्‍यांनी या कारवाईच्‍या निषेधार्थ  कागल बंदची हाक दिली. दरम्यान, प्रकाश गाडेकर आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानसमोर व त्‍यांच्‍या निवासस्‍थानांच्‍या मार्गांवरही मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. हसन मुश्रीफ हे मुंबई येथे आहेत. या प्रकरणी माहिती घेऊन बोलतो, असे त्‍यांनी स्पष्ट केले आहे.

‘ईडी’चे अधिकारी पोलिसांसोबत आज सकाळी कागल येथे आले. हसन मुश्रीफ व प्रकार गाडेकर यांच्‍या निवासस्थांनी ‘ईडी’ अधिकारी माहिती घेत आहेत.  दरम्यान, कागल शहरातील देवी चौक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी  माेठी गर्दी केल्यामुळे स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. राष्‍ट्रवाद काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचा निषेध करीत आणि आमदार हसन मुश्रीफ यांचा जयघोष करीत मोठ्या संख्येने निवासस्थानी दाखल झाले.

Back to top button