शिंदे-फडणवीस सरकारने 6 महिन्यांत काय दिले? : अजित पवार | पुढारी

शिंदे-फडणवीस सरकारने 6 महिन्यांत काय दिले? : अजित पवार

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा :  भाजपने कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये चांगली चालत असलेली सरकारे पाडून आपले सरकार आणले. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने सहा महिन्यांत काय दिले? केवळ महापुरूषांची बदनामी, बेताल वक्तव्ये, गुंडगिरीची भाषा, प्रकल्प राज्याबाहेर घालवले व चांगल्या निर्णयाला स्थगिती दिली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

चन्नेकुप्पी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 43 मंत्रिपदे असताना केवळ 20 मंत्री केले. त्यामध्येही एकाही महिलेला संधी दिली नाही याचे नेमके कारण काय, असा सवाल त्यांनी केला. यावेळी आ. हसन मुश्रीफ, आ. राजेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजीराजे स्वराज्यरक्षकच

संभाजीराजे हे स्वराज्यरक्षकच होते, असे ठासून सांगत यावरून सध्या राजकारण सुरू असून माझा राजीनामा सरकारमधील लोक मागत आहेत. त्यांना तो मागण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत चुकीचा इतिहास मांडण्याचा सत्ताधार्‍यांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

Back to top button