राजोपाध्येनगर येथून सोन्याचे दहा तोळे दागिने लंपास | पुढारी

राजोपाध्येनगर येथून सोन्याचे दहा तोळे दागिने लंपास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राजोपाध्येनगर येथील घरातून 3 लाख 57 हजारांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. रोख रकमेसह 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे. याबाबत अमितसिंह रमेशसिंह परदेशी (वय 35) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.

परदेशी यांनी 28 डिसेंबरला तिजोरीतील दागिने व रोख रक्कम पाहिली होती. दरम्यान, 1 जानेवारीला 10 तोळ्यांचे दागिने व रोख 10 हजार मिळून आले नाहीत. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचा हार, रिंगा, झुमके, कर्णवेल, सोन्याचे गोप, ठुशी, नेकलेस व कर्णफुलांचा समावेश आहे.

Back to top button