कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’ला वाहतूक नियमांचे उल्लंघन; 641 दुचाकीस्वारांवर गुन्हे | पुढारी

कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’ला वाहतूक नियमांचे उल्लंघन; 641 दुचाकीस्वारांवर गुन्हे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सरत्या वर्षाला निरोप देत असताना शनिवारी सायंकाळपासून रविवार मध्यरात्रीपर्यंत शांतता- सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्‍या तसेच वाहतूक नियमांचे उल्लघन करणार्‍या शहर, जिल्ह्यातील 641 वाहनधारकांवर 3 लाख 34 हजार 400 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणमार्फत स्वतंत्रपणे कारवाई केली आहे. थर्टी फर्स्टला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलिस दलामार्फत यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. शहर, जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदीही केली होती.

बेकायदा दारू विक्री अड्ड्यांवर 6 ठिकाणी छापे टाकून 71 हजारांचा दारूसाठा जप्त केला आहे. दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 6 जणांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले. मद्यधुंद अवस्थेत वाहने पळविणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करून 25 वाहने जप्त केली आहेत. 24 तासांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 641 जणांवर दंडात्मक कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button