वडणगे(कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : अत्यंत अतितटीने व चुरशीने झालेल्या व शेवटच्या क्षणापर्यंत आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या वडणगे (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले. थेट सरपंच निवडीत शेतकरी सेवा आघाडीच्या (मास्तर गट) संगीता शहाजी पाटील यांनी विरोधी ग्रामविकास आघाडीच्या (बी.एच.गट) वृषाली रवींद्र पाटील यांचा पराभव करत 486 मतांनी विजय मिळवला.
गतवेळच्या पराभवाचा वचपा काढत येथील मास्तर गटाने सरपंचपद आपल्याकडे खेचून घेतले.त्याचबरोबर सदस्यपदाच्या 17 जागांपैकी 14 जागा जिंकून बहुमत मिळवले. विरोधी बी.एच.गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.येथील सर्वच अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला.
सरपंच पदासाठी दोनही गटांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत मास्तर गटाने एकहाती सत्ता मिळवली. गत निवडणुकीत सरपंचपद बी.एच.गटाकडे व बहुमत मास्तर गटाकडे होते. यावेळी मात्र मास्तर गटाने सरपंच पदासह बहुमत मिळवत एकहाती वर्चस्व राखले आहे.
थेट सरपंच निवडीत शेतकरी सेवा आघाडीच्या (मास्तर गट) संगीता शहाजी पाटील यांना 4686 तर विरोधी वृषाली रवींद्र पाटील यांना 4200 मते मिळाले.सदस्य पदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मध्ये संगीता मोहन नांगरे (836), प्रभाग क्रमांक सहा मध्ये ऋषिकेश ठाणेकर (568), व स्वप्नाली नितीन नाईक (678) या तीन बी.एच. गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला.
विद्यमान सभागृहातील बी.एच.गटाचे उत्तम संभाजी साखळकर व मास्तर गटाचे सुरज राजेंद्र पाटील यांना मतदारांनी नाकारले. माजी सरपंच सचिन चौगले यांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक पाच मधील निवडणूक लक्षवेधी ठरली. येथे दोनही गटातील उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवले होते. येथील अटीतटीच्या लढतीत मास्तर गटाच्या रोहित पांडुरंग पोवार या नवख्या उमेदवाराने प्रवीण दिनकर चौगले यांचा पराभव करून 52 मतांनी विजय मिळवला.तर याच प्रभागात मास्तर गटाच्या सविता यशवंत धनगर यांनी 234 मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक चार मध्ये मास्तर गटाचे सतीश बाळासो पाटील यांनी संपर्क व प्रभागातील कामाच्या जोरावर ग्रामपंचायतीच्या सभागृहात तिसऱ्यांदा प्रवेश मिळवला. त्यांनी बी. एच.गटाचे विजय जाधव यांचा पराभव करत 241 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
प्रभाग एक – महेश शिवाजी सावंत (784), पद्मश्री संतोष लोहार (964), रेश्मा अमोल तेलवेकर (788).
प्रभाग 2- जयवंत दगडू कुंभार (964), उमाजी पांडुरंग शेलार (893), राधिका संजय माने (866).
प्रभाग तीन – संतोष बाबुराव नांगरे (623), नितीन तुकाराम साखळकर (598),
प्रभाग चार -सतीश बाळासो पाटील (946), ज्योती अमर नरके (870), रूपाली विजय जौंदाळ(867).
प्रभाग पाच – रोहित पांडुरंग पोवार (781), सविता यशवंत धनगर (872), संगीता मोहन नांगरे (836).
प्रभाग सहा– ऋषिकेश ठाणेकर (568), स्वाती यशवंत नाईक (813), स्वप्नाली नितीन नाईक (678).