कोल्हापूर : कोरोची ग्रामपंचायतीसाठी ७० टक्के मतदान | पुढारी

कोल्हापूर : कोरोची ग्रामपंचायतीसाठी ७० टक्के मतदान

कबनूर, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायतीच्या सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.१८) मतदान झाले. १४९२१ मतदारांपैकी एकूण १०५५६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ७०.७४ टक्के मतदान झाले. यावेळी वृध्द, अपंग व्यक्ती व एका तृतीयपंथियाने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. सरपंच पदासाठीचे ८ व सदस्य पदासाठीचे ५८ अशा​ एकूण ६६ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले.

जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यानी मतदान केंद्रावर येवून भेट देवून पाहणी केली. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजित पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी हातकणंगले येथे मतमोजणी व निकाल असल्यामुळे बाजी कोण मारणार ? याची चर्चा सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तर आपलाच विजय व्हावा म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button