कोल्हापूर : वडणगे ग्रामपंचायतीसाठी ८५ टक्के मतदान | पुढारी

कोल्हापूर : वडणगे ग्रामपंचायतीसाठी ८५ टक्के मतदान

वडणगे, पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता.करवीर) येथे ८५ टक्के मतदान झाले. एकूण १२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. दुपारनंतर मात्र, चुरशीने मतदान झाले. एकूण १०,७६१ पैकी ९,१७४ इतके मतदान झाले. सरासरी ८५.२५ टक्के मतदान झाले.

प्रभाग क्र.एक मध्ये ७९ टक्के, प्रभाग क्रमांक दोन मध्ये ८६ टक्के तर प्रभाग क्रमांक क्रमांक तीनमध्ये ८७%, प्रभाग चार मध्ये ८७ टक्के प्रभाग क्रमांक पाचमध्ये ८९ टक्के, प्रभाग ६ मध्ये ८० टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. वडणगे हे तालुक्यातील मोठे व संवेदनशील गाव असूनही बंदोबस्तासाठी पोलीस फौजफाटा कमी होता. त्यामुळे संख्येने कमी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताचा ताण दिसत होता. गर्दीला पांगवताना पोलीस कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.

हेही वाचलंत का?

Back to top button