कोल्हापूर : निम्म्या शहराचा आज पाणीपुरवठा खंडित | पुढारी

कोल्हापूर : निम्म्या शहराचा आज पाणीपुरवठा खंडित

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिंगणापूर जल उपसा केंद्राकडील 435 अश्वशक्तीचा पंप सेट बंद पडला आहे. हा पंप सेट दुरुस्तीचे काम उद्या (शुक्रवारी) होणार आहे. परिणामी शिंगणापूर जल उपसा केंद्रावर अवलंबून असणार्‍या शहरातील ए, बी, ई वॉर्ड आणि त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही. काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

या भागात होणार नाही पाणीपुरवठा : ए, बी वॉर्ड : लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंग रोड परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ.

ई वॉर्ड : राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, शाहू मिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंशन, पाच बंगला, राजाराम रायफल, माळी कॉलनी, मोहल्ला परिसर, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल, पांजरपोळ, सम—ाटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडियल सोसायटी, तोरणानगर, काशिद कॉलनी, माने कॉलनी, चाणक्यनगर, एसटी कॉलनी, संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शािंतनिकेतन, ग्रीन पार्क, गोळीबार मैदान परिसर, उलपे मळा, रमणमळा, केव्हीज पार्क, नागाळा पार्क, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, महाडिक वसाहत, लिशा हॉटेल, मार्केट यार्ड, कावळा नाका, स्टेशन रोड, शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली, व्यापारपेठ.

Back to top button