चंदगड : किटवाड धबधब्याच्या पाण्यात बुडून बेळगावच्या चार मुलींचा मृत्यू, एकीला वाचवले! | पुढारी

चंदगड : किटवाड धबधब्याच्या पाण्यात बुडून बेळगावच्या चार मुलींचा मृत्यू, एकीला वाचवले!

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या किटवाड (ता. चंदगड) येथे लघुपाटबंधारे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार मुलींचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीला वाचवण्यात किटवाड येथील तीन तरुणांना यश आले. सदर घटना शनिवार (दि. २६) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी घडली. सदर पर्यटक बेळगाव येथील असून त्यांचा नेमका पत्ता अद्याप समजू शकला नाही.

सदर ठिकाणी धरण आहे. यापैकी क्रमांक एकवर सदर घटना घडली. या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर तिसरी वाचवण्यासाठी गेली, त्यानंतर चौथी असे करत पाच तरुणी त्या पाण्याच्या खड्ड्यात पडल्या आणि पाचही बुडाल्या. यामुळे चार तरुणींची स्थिती गंभीर होत गेली.

दरम्यान, तातडीने किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील तरुणांनी धाव घेऊन पाण्याच्या खड्ड्यातून पाचही तरुणींना बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले होते. एका तरुणीला वाचवण्यात या तरुणांना यश आले. बेळगाव येथील अनेक कुटुंबे मिळून असे चाळीस जण धरणाच्या ठिकाणी सहलीसाठी आले होते.

हे ही वाचा :

Back to top button