गणेशवाडीत विसर्जन मिरवणुकीवेळी पोलिसांना धक्काबुक्की | पुढारी

गणेशवाडीत विसर्जन मिरवणुकीवेळी पोलिसांना धक्काबुक्की

कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : गणेशवाडी ता. शिरोळ येथे विनापरवाना गणपती विसर्जन मिरवणूक काढून पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत जखमी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित सावंता देवताळे(वय 50), आसिफ फरदिन पठाण (वय 34), प्रवीण गोलिंग अनुरे(वय 32) सुरज महादेव हूलोंळे (वय 25)सचिन कल्लया मठपती(सर्व रा. गणेशवाडी) अशी त्यांची नावे असून यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून ट्रॅक्टर चालक सचिन मठपती हा फरार आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडी येथे विनापरवाना गणेश विसर्जन मिरवणूक काढले प्रकरणी जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडन मिळालेली माहिती अशी की अजित देवताळे, आसिफ पठाण, प्रवीण अनुरे, सुरज हुलोळे व सचिन मठपती यांनी कोरोनाची संचार बंदी असताना बेकायदेशीर जमाव जमवून ट्रॅक्टर क्र. (एम.एच 10,बी.एक्स, 2045) व ट्रॉली मधून विनायक तरुण मंडळ गणेशवाडी असा फलक लावून विनापरवाना मिरवणूक काढून फटाके वाजवत जात होते.

विनायक मंडळाची कोणतीही नोंदणी नसताना मिरवणुकीचा कोणतीही परवानगी नसताना विनापरवाना मिरवणूक काढता येणार नाही असे सांगत पोलिसांनी मिरवणूकीस मज्जाव केला असता संशयित 5 आरोपींसह मध्य प्राशन केलेल्या अज्ञात 10 ते 15 जणांनी आम्ही मिरवणूक काढणारच. तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगून मिरवणूक काढणारच असा पोलिसांनाच दम दिला. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना धक्काबुक्की केली. या मध्ये पो.हे.कॉ विजय रामचंद्र घाटगे यांच्या डोळ्याला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान पोलिसांनी मिरवणुकीचा ट्रॅक्टर जप्त करत चौघांना ताब्यात घेतले आहे. चालक फरार झाला आहे. कोरोणाच्या संचारबंदीचा भंग करून जिल्हाधिकार्‍यांचा आदेश भंग करून मद्यप्राशन करून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button