Kolhapur : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे यांची निवड | पुढारी

Kolhapur : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे यांची निवड

कागल; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई या संस्थेच्या संचालकपदी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्याच्या साखर कारखान्यांची शिखर संस्था म्हणून या संघाची ओळख आहे. महिला राखीव मतदार संघातून श्रीमती घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.

त्या सध्या शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी देखील काही काळ राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. अत्यंत मानाच्या अशा या शिखर संस्थेवर श्रीमती घाटगे यांची निवड झाल्याने शाहू ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या निवडीची माहिती समजताच शाहू उद्योग समूहात आनंदाचे वातावरण पसरले. फटाके वाजवून या निवडीचे स्वागत सभासद व कर्मचाऱ्यांनी केले.

हेही वाचा

Back to top button