छ. राजाराम साखर कारखान्याचे पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : महादेवराव महाडिक | पुढारी

छ. राजाराम साखर कारखान्याचे पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : महादेवराव महाडिक

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे यावर्षी 5 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. किमान 12.25 टक्के साखर उतार्‍याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण करू, असा विश्वास कारखान्याचे संचालक माजी आ. महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला.

त्यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून कारखान्याच्या 2022-23 चा गळीत हंगाम प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कारखान्याकडे पुरेशी ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा उपलब्ध आहे. या वर्षी नवीन ऊस तोडणी मशिन खरेदीसाठी देखील सहकार्य करण्यात आले आहे. या हंगामासाठी सभासद, बिगर सभासदांनी आपला नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळितास पाठवून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाडिक यांनी केले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, माजी आ. अमल महाडिक, सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, कारखान्याचे माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद, पद्मभूषण वसंतदादा ऊस तोडणी-वाहतूक संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button