साडी ड्रेपिंग, ग्रुमिंग अन् चित्रपट शोमध्ये रमल्या ‘कस्तुरी’ | पुढारी

साडी ड्रेपिंग, ग्रुमिंग अन् चित्रपट शोमध्ये रमल्या ‘कस्तुरी’

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा सध्या प्रत्येकाला दिवाळीचे वेध लागले आहेत. अशातच फराळासह गृहसजावटीच्या कामांत मग्न असणार्‍या महिलावर्गासाठी ‘साडी ड्रेपिंग आणि ग्रुमिंग कार्यशाळा’ दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने शनिवारी (15 ऑक्टोबर) घेण्यात आली. सण-उत्सवाचे औचित्य साधून अनेकजणींना पारंपरिक पेहराव करण्याची पर्वणी मिळते. यासाठीच सणावेळी चारचौघींमध्ये उठून दिसण्यासाठी स्वतःचा मेकअप आणि साडी ड्रेपिंग कसे करावे, याची कार्यशाळा घेण्यात आली.कार्यक्रमात वेदिका ब्युटी पार्लरच्या वतीने महिलांना सौंदर्यासंबंधित विविध टिप्स देण्यात आल्या. तसेच महिलांसाठी खास ‘तिन्ही सांजा’ या चित्रपटाच्या खास शोचे आयोजनही करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमांना कस्तुरी क्लबच्या सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महिलांसाठी खुले व्यासपीठ देणार्‍या कस्तुरी क्लबची नूतन सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. क्लबमार्फत महिलांसाठी अनेक सांस्कृतिक, आरोग्य, सामाजिक, कलात्मक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याद्वारे महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील बदलांसोबत घराच्या चौकटीबाहेर मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी कायम असते. यानिमित्त इच्छुक महिलांना कस्तुरी परिवारात सहभागी होण्याची शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. नोंदणी करताच बॉस कंपनीच्या स्टेनलेस स्टीलच्या थर्माससह इतर अनेक मोफत व डिस्काऊंट कूपन्स दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी 8390059128, 8805007724 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

आज सभासद होणार्‍या पहिल्या 50 महिलांना मिळणार चांदीचे नाणे खास दिवाळीनिमित्त दत्ताजीराव परशराम माने सराफ पेढी यांच्याकडून नव्याने सभासद होणार्‍या महिलांना 2 ग्रॅम चांदीचे नाणे भेट दिले जाणार आहे. याकरिता आज, सोमवारी (दि.17) टोमॅटो एफ. एम. कार्यालय, कोल्हापूर येथे कस्तुरी क्लब सभासद नोंदणी करणार्‍या पहिल्या 50 महिलांना हे चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे.

Back to top button