कोल्हापूर : दै. पुढारी समाजोपयोगी कार्यात अग्रभागी : एस. आर. पाटील | पुढारी

कोल्हापूर : दै. पुढारी समाजोपयोगी कार्यात अग्रभागी : एस. आर. पाटील

मुदाळतिट्टा (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने दै. ‘पुढारी’तर्फे ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ हा उपक्रम संपूर्ण राबवून विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्याची शिकवण दिली. दै. पुढारी कायमच समाजोपयोगी कार्यात अग्रभागी राहिल्याने तो वाचकांच्या पसंतीस उतरला आहे, असे मत प्राचार्य एस. आर. पाटील यांनी व्यक्त केले.

ते मुरगूड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगुड येथील दै. पुढारीचे एजंट अँथोनी बारदेस्कर होते.

स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य एस. पी. पाटील यांनी केले. यावेळी एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन एजंट पप्पू बारदेस्कर, पालक पांडुरंग पुजारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी यांचेही मनोगत झाले. दै. पुढारीचे प्रकट वाचन विद्यार्थ्यांनी केले. यावेळी सुपरवायझर एस. एच .निर्मळे, पांडुरंग लोकरे, आर. जी. पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार एम .बी. टेपुगडे यांनी केले.

Back to top button