कोल्हापूर : रमणमळ्यात डेंग्यूने घेतला महिलेचा बळी | पुढारी

कोल्हापूर : रमणमळ्यात डेंग्यूने घेतला महिलेचा बळी

कोल्हापूर : रमणमळा परिसरातील गौरी प्रतापसिंग पोवार (वय 37) या महिलेचा डेंग्यूमुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दि. 8 ऑक्टोबर रोजी तीव्र ताप, थंडी जाणवू लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू होते. त्यांचा डेंग्यू अहवाल बाधित आला. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती गंभीर झाली. मंगळवारी नातेवाईकांनी गौरी यांना कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मागे मुली, पती, सासू असा परिवार आहे. रमणमळा परिसरात अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. परिसरातील नागरिकांनी त्याबाबत महापालिकेला कळविले. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पोवार यांचा मृत्यूनंतर महापालिकेच्या वतीने स्वच्छता व औषध फवारणी करून परिसरातील घरांचा सर्व्हे केला. ताप, थंडी असणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना मनपा आरोग्य विभागाने केली आहे.

Back to top button