कोल्हापूर : म्हाकवेत दसरा उत्साहात | पुढारी

कोल्हापूर : म्हाकवेत दसरा उत्साहात

म्हाकवे; पुढारी वृतसेवा: म्हाकवेत (ता.कागल) शाही पद्धतीने दसरा साजरा करण्यात आला. नवरात्रोत्सवात गेले दहा दिवस गावात भक्तीमय वातावरण होते.  पालखीचे मानकरी असलेले बाळासाहेब पाटील, दिलीप पाटील, सुखदेव पाटील, कृष्णा पाटील, अशोक पाटील यांच्या उपस्थितीत दररोज पालखी मिरवणूक होत होती.

देवीच्या जागरादिवशी पालखीचे पूजन मानकरी पाटील कुटुंबीयांच्‍या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री हालसिद्धनाथ, श्री हनुमान आधी देवांच्या पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली. त्यानंतर गावाच्या वेशीबाहेर दोन्ही पालखी आल्यानंतर शम्मीच्या वृक्षाचे पूजन करण्यात आले. मानकरी बाळासो पाटील, सुखदेव पाटील, दिलीप पाटील, अशोक पाटील, कृष्णा पाटील, डी एच पाटील यांच्या हस्ते करण्यात वृक्षाचे पूजन करण्यात आले. यावेळी ढोल, कैतयाळ, पालखी छत्र्या आधींचा समावेश करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो लोकांनी सोन्याची लूट केली. कार्यक्रमाचे पौरोहित्य दत्ता जोशी यांनी केले.

 

Back to top button