‘राजाराम’ला सतेज पाटील यांच्या आदेशाने कर्ज : मुश्रीफ | पुढारी

‘राजाराम’ला सतेज पाटील यांच्या आदेशाने कर्ज : मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजाराम सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने दिलेले कर्ज हे सतेज पाटील यांच्या आदेशाने दिल्याचे माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

राजाराम कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी आमदार अमल महाडिक यांनी आपल्या भाषणात केडीसी बँकेने कारखान्याला 79 कोटींचे कर्ज मंजूर केले, त्याबद्दल बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे आभार मानले. याबाबत गोकुळ येथे मुश्रीफ यांना प्रतिक्रिया विचारता ते म्हणाले, ते कर्ज सतेज पाटील यांच्या आदेशानेच दिले होते. यावर सतेज पाटील यांनीही बँकेचे काम हे कर्ज वाटपाचे आहे, त्याप्रमाण नियमाप्रमाणे कर्ज वाटप केल्याचे सांगितले.

Back to top button