बाबू फरास अजातशत्रू व्यक्तिमत्त्व : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

बाबू फरास अजातशत्रू व्यक्तिमत्त्व : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : माजी महापौर बाबू फरास हे हजरजबाबी व्यक्तिमत्त्वाचे कसलेले जनताभिमुख कार्यकर्ते होते. तसेच ते अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते, अशी आदरांजली आ. हसन मुश्रीफ यांनी वाहिली. दरम्यान, फरास यांच्या नावे कोल्हापुरात लोकप्रतिनिधी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी सूचनाही यावेळी काहीजणांनी शोकसभेत केली.

महापालिकेत सर्वपक्षीय शोकसभेत बाबू फरास यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ. जयश्री जाधव म्हणाल्या, फरास यांनी शहरातील बहुजनांचे नेतृत्व केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी फरास यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते असे सांगितले. माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी फरास हे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक होते, असे सांगितले. माजी नगरसेवक अशोक भंडारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी, जयकुमार शिंदे, अशोक पोवार, गणी आजरेकर यांच्यासह इतरांनी मनोगत व्यक्त केले. माजी आ. के. पी. पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, राजेश लाटकर उपस्थित होते.

जवान राजशेखर मोरेंच्या कुटुंबीयांना एक लाखांची मदत

आपत्ती निवारण विभागाचे जवान राजशेखर मोरे यांचा दोनच दिवसांपूर्वी बीड येथे मदतकार्य करीत असताना बुडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आ. हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने एक लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा आ. मुश्रीफ यांनी महापालिकेत केली.

Back to top button