कोल्हापूर : ई वॉर्डपाठोपाठ संपूर्ण शहरातही गॅस पाईपलाईन

कोल्हापूर : ई वॉर्डपाठोपाठ संपूर्ण शहरातही गॅस पाईपलाईन
Published on
Updated on

कोल्हापूर ; डॅनियल काळे : कोल्हापूर शहरातील ई वॉर्डात नळाद्वारे 24 तास गॅसपुरवठा करणारी योजना कार्यान्वित झाली आहे. जेथे पाईपलाईन झाली आहे, तेथे महिनाभरात गॅस पुरवठा सुरू होणार आहे. आता या महिन्यात उर्वरित शहरातही गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम होणार आहे. जिथे जिथे गॅसची गरज आहे, त्या प्रत्येक ठिकाणी गॅसपुरवठा केला जाणार आहे, असे एचपी ऑईल कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगीतले.

दाभोळ ते बंगळूर अशी मोठी गॅस पाईपलाईन टाकण्याची योजना 11 वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. ही पाईपलाईन कोल्हापूर जिल्ह्यातून जात असल्याने कोल्हापूर शहर, इचलकरंजी, सांगली ही जवळची शहरेही या पाईपलाईनद्वारे जोडण्याचे ठरले होते. त्यानुसार आता प्रत्यक्षात ही योजना आपल्या दारापर्यंत आली आहे. कोल्हापूर शहरात सुमारे 300 किलोमीटर अंतराचे जाळे या गॅस पाईपलाईनने निर्माण केले आहे. आता शहर आणि उपनगरातही याचे जाळे निर्माण होणार आहे. महापालिका, ग्रामपंचायती यांच्या परवानगीचे प्रस्ताव एचपी ऑईल कंपनीने दिले आहेत. यापैकी कोल्हापूर महापालिकेच्या ताराराणी मार्केट आणि राजारामपुरी बागल मार्केट या दोन्ही विभागीय कार्यालयांकडून परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

पर्यावरणपूरक गॅस

पाईपलाईनद्वारे मिळणारा हा गॅस पर्यावरणपूरक आहे. तसेच 24 तास या गॅसचा पुरवठा होणार आहे. नळ सुरू केला की, सहजच हा गॅस उपलब्ध होणार आहे. सध्या सिलिंडर टाकीद्वारे मि??ळणारा गॅस हा 1050 ते 1100 रुपयापर्यंत मिळत आहे. पाईपलाईनद्वारे मिळणारा गॅस हा अवघ्या 600 रुपयांना मिळणार आहे. तसेच समजा, एखाद्या ठिकाणी गळती लागली की, हा गॅस लगेचच हवेत मिसळणार आहे. त्यामुळे हा गॅस वापरण्यासाठी अत्यंत सुरक्षित असा आहे.

तर दोन वर्षांपूर्वीच झाला असता पुरवठा

भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालय, गॅस अ‍ॅथोरिट ऑफ इंडिया यांच्या देखरेखीखाली ही योजना सुरू आहे. कोल्हापूर महापालिकेत खोदाईच्या परवानगीसाठी दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित पडली होती. वेळीच परवानगी मिळाली असती तर आत्तापर्यंत केव्हाच ही योजना पूर्ण झाली असती. महापालिकेच्या परवानगीमुळे ही योजना रखडली होती. आता परवानग्यांचा घोळ संपल्याने योजना गतीने पूर्ण होणार आहे.

एक लाख ग्राहकांचे उद्दिष्ट

कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5 लाख 48 हजार इतकी आहे. 1 लाख 40 हजार मिळकती या शहरात आहेत. त्यामुळे किमान एक लाख घरांमध्ये गॅसचा पुरवठा करायचे उद्दिष्ट आहे. त्यासोबतच औद्योगिक वसाहती आणि हॉटेलसह अन्य व्यावसायिकांनाही गॅसचे कनेक्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news