कोल्हापूर : करंजिवणेत देखाव्यातून अवतरली पंढरी..! | पुढारी

कोल्हापूर : करंजिवणेत देखाव्यातून अवतरली पंढरी..!

हमीदवाडा: मधुकर भोसले : कागल तालुक्यातील दुर्गम अशा करंजिवणे येथे संजय शिवाजी आंग्रे यांच्या घरी कल्पकतेतून अवघी पंढरीच अवतरली आहे. श्री गणपती बाप्पाच्या देखाव्यामध्ये त्यांनी पंढरीची चंद्रभागा, वारकरी, पुंडलिकाचे मंदिर आदीचे यथोचित व आकर्षक दर्शन घडविले आहे.

आंग्रे यांना प्रत्येक गणपती उत्सवामध्ये विविध प्रकारचे देखावे घरी करण्याची आवड आहे. यासाठी ते  स्वतः  कष्ट घेतात. यावर्षी त्यांनी देखाव्यासाठी चंद्रभागातीर निवडला आहे. चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल मूर्ती दाखवतानाच, चंद्रभागेच्या घाटांवर उतरणारे व दर्शन घेणारे वारकरी तसेच अंघोळ करणारे वारकरी पाण्यातील नावा त्याचप्रमाणे पुंडलिकाचे मंदिर, त्यावरील अभंगांच्या ओळी तसेच अन्य छोटी मोठी मंदिरे त्यांची शिखरे हे हुबेहूब बनवले आहे. उचित असे अभंग लावून हे पाहताना आपण पंढरपूरमध्ये आहोत असा भास होतो. आंग्रे यांच्या या कल्पकतेचे लोकांमधून कौतुक होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button